मित्रांनो जसे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी कापसाला खूप जास्त भाव असल्याने शेतकऱ्यांनी कॉटन जास्त प्रमाणामध्ये कापूस लावलेला आहे परंतु यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात कापसाला फक्त साडे सात ते आठ हजारापर्यंत भाव आलेला आहे.
महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांना कापसाचा योग्य दर मिळाला नाही त्यामुळे आतापर्यंत खूप सारे शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही त्यांना खूप सार्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याऐवजी केंद्र सरकारने आपल्या राज्य सरकारने बियाणांच्या दरात 475 ग्रॅम प्रतिपॅकेट रुपयांनी 43 रुपयांची वाढ केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे दृश्य समोर येत आहे.
मित्रांनो केंद्र सरकारला किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारला ही दरवाढ छोटी दिसत असली तरीही आपल्या शेतकरी बांधवांसाठी एवढे पैसे देणे शक्य नाही कारण की एका पॅकेटमध्ये 50 ते 60 रुपये वाढले तर शेतकऱ्यांना दहा ते वीस पॅकेट साधारणपणे लागतात. याप्रमाणे हिशोब केला तर शेतकऱ्यांना खूप जास्त पैसे द्यावे लागत आहे.
महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीमुळे सुद्धा खूप सारे शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्यासोबतच कापसाचे सुद्धा नुकसान झालेले आहे परंतु आतापर्यंत नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कराव तरी काय.