नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मधील जे व्यक्ती बेघर असेल किंवा जे व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली असेल त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी आवास योजना ही सुरुवात केलेली आहे.
गांधी योजना काय आहे महाराष्ट्रामधील दारिद्र्यरेषा खाली असलेल्या सर्व गरजू गरीब कुटुंबांसाठी सुरू केलेली एक नवीन योजना आहे, या योजनेच्या मदतीने अल्पसंख्यांक परिवारांना, किंवा आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारांना घरे बांधून देण्याचा संकल्प केलेला आहे.
जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की इंदिरा गांधी योजना या योजनेचा उद्देश काय होता त्याचप्रमाणे राजीव गांधी योजना या योजनेचा उद्देश सुद्धा गरीब व्यक्तींना किंवा गरजू व्यक्तींना मदत करणे असाच आहे.
जे व्यक्ती दारिद्र्य रेषा खाली आहे म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न 45000 पेक्षा कमी आहे किंवा जे शेड्युल कास्ट मध्ये येतात अशा व्यक्तींसाठी महाराष्ट्र सरकार राजीव गांधी आवास योजना या योजनेची मार्फत त्यांना घरी बांधून देण्याचे कार्य करणार आहे.
जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की राजीव गांधी आवास योजना ही जून 2018 मध्ये लागू करण्यात आली परंतु या योजनेचे उद्देश्य दोन टप्प्यांमध्ये विभाजित केले गेले होते.
1 } त्यामध्ये पहिला म्हणजे देशाला झोपडपट्टी मुक्त राष्ट्र बनवणे त्यासोबतच
2 } देशांमधील सर्व राज्यांमध्ये असलेले गोरगरिबांना दारिद्र्य रेषेमध्ये असलेल्या व्यक्तींना राहण्याची सुविधा निर्माण करणे.